सोयाबीनवरील किडींचे व रोगांचे एकीकृत व्यवस्थापन
सोयाबीन पिकावर प्रामुख्याने रोपपर, मुळकूज, शेंगावरील करपा, सूक्ष्म जिवाणूचा करपा इत्यादी रोग तसेच खोडमाशी, चंक्रभुंगा, पाने गुंडाळणारी अळी आणि पाने खाणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव आढळतो. रासायनिक बुरशीनाशकाचा व किटकनाशकाचा दुष्परिणाम तसेच त्यांचा वापर कमी करण्याचे दृष्टीने रोगाचे व किडींचे गरजेनुसार नियंत्रण करणे आवश्यक आहे. त्यासाठी रोग व किडी याकरिता एकीकृत व्यवस्थापन पध्दतीचा अवलंब करणे फायद्याचे ठरते.
सोयाबीनची लागवड करण्यापूर्वी शेतात उन्हाळी नांगरणी करावी. त्यामुळे बुरशीची बीजे, तंतू तसेच बुरशीची फळे या रोगांचा आणि किडीचे अवस्थांचा, पक्षांव्दारे तसेच उष्णतेमुळे आणि जमिनीत खोल गाडल्या जाऊन नाश होतो.
- सोयाबीनची पेरणी जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत संपवावी.
- विषाणूमुक्त निरोगी बियाणे वापरावे.
- पेरणीसाठी कीड व रोग प्रतिकारक्षम असणाऱ्या वाणांची (उदा. एनआरसी-३७, जेएस ९३-०५ व सुवर्ण सोया) पेरणी करीता निवड करावी.
- पेरणीपूर्वी बुरशीनाशकाची किंवा जैविक बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करावी.
- पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेत शेत तणमुक्त ठेवावे.
- बांधावर असणाऱ्या किडींच्या पुरक वनस्पतींचा नाश करावा.
- शेतात अगदी सुरुवातीलान रोगट झाडे दिसताच उपटून नष्ट करावी.
- चक्रभूंगा व खोडमाशीच्या प्रादुर्भावामुळे किडग्रस्त पाने, फांद्या वाळतात, म्हणून किडग्रस्त झाडे, वाळलेल्या फांद्या, पानाचे देठाचा अळीसह नायनाट करावा.
- केसाळ अळी तसेच तंबाखूची पाने खाणाऱ्या अळ्यांचा त्या लहान असताना जाळीदार पानांसह नायनाट करावा.
- सोयाबीन पिकाचे नियमित सर्वेक्षण करावे आणि किडींनी आर्थिक नुकसानीची मर्यादा पातळी गाठताच कीड नियंत्रणाचे उपाय योजावेत. तसेच आवश्यकतेनुसार रोगाची तीव्रता व पिकाची अवस्था पाहून बुरशीनाशकाची फवारणी करावी.
- पाने खाणाऱ्या किडींचे व्यवस्थापनाकरिता ५ टके निंबोळी अर्काचा वापर करावा.
- सोयाबीन पिकानंतर भुईमुगाचे पीक घेऊ नये.
- पिकाची फेरपालट करावी.
सोयाबीनचे उत्पादन वाढीसाठी महत्वाच्या सूचना :
- वेळेवर (१५ जुलैपर्यंत) पेरणी करावो. मात्र धुळ पेरणी करु नये.
- जमिनीच्या प्रकारानुसार योग्य उन्नत व अधिक उत्पन्न देणारे वाण निवडावे उदा. सुवर्ण सोया, पिडकेल्ही यलो एम.ए.यु.एस-१५८, एम. ए.यु. एम. १६२
- अनुवंशिक शुध्दता अगाणारे तसेच जोपदार व चांगल्या प्रतिचे दर्जेदार बियाणे पेरणीसाठी वापरावे. ४) पेरणीपूर्वी बियाण्याची उगवणशक्ती अवश्य तपासून घ्यावी.
- पेरणीपूर्वी बियाण्यास बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करावी व त्यानंतरच जिवाणूसंवर्धन लावावे.
- विषाणे ४ सें. मी. पेक्षा जास्त खोल पेरु नये.
- उताराला आडवी वसेच पूर्व-पश्चिम पेरणी करावी. पेरणी पट्टा पध्दतीने करावी. ८) पेरणीनंतर अंदाजे ३० दिवसांनी प्रत्येकी ३ ओळीनंतर १ काढावी.
- आवश्यकतेनुसार बियाणे स्वतःच्या शेतात तयार करावे. यामुळे खर्चामध्ये बचत होते आणि दर्जेदार बियाणे हमखास मिळते.
- ज्या शेतात पाण्याचा योग्य निचरा होत नसेल अशा जमिनीत जिन्सम १० बॅग्ज (५ किंटल) प्रति हेक्टरी या प्रमाणात पूर्व मशागतीचे वेळी मिसळून द्यावे.
- चुनखडीयुक्त शेतामध्ये (सामू ८.० पेक्षा जास्त) सोयाबीनचे पिकास फेरस सल्फेट ०.५ टके (५० ग्रॅम) +०.२५ (२५ ग्रॅम) कळीचा चुना १० लिटर पाण्यात मिसळून या मिश्रणाची फवारणी दोन वेळा (पहिली फवारणी पोक फुलावर येण्यापूर्वी आणि दुसरी शेंगा भरण्याच्या अवस्थेमधे) करावी. यामुळे लोहाची कमतरता पिकास भासणार नाही (पाने पिवळी पडणे) व योग्य उत्पादन मिळेल.
- पीक फुलोरावस्थेत असताना डवरणी मुळीच करू नये
- कापणी अगदी अचूक वेळेवर करून जास्त काळ तीग लावून न ठेवता मळणी करावी.
- मळणी करताना इमची गती ३५० ते ४०० फेरे प्रति मिनिट यापेक्षा जास्त नसावी.
0 टिप्पण्या
शेतकरी मित्रांनो तुम्हाला हळद या पिकाबद्दल अजून कोणतीही माहिती हवी असेल तर खाली कमेंट करा तुमच्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला तुम्हाला मिळतील धन्यवाद व फॉलो करा,