कोथिंबीर पिकाचे व्यवस्थापन | coriander crop management -Theplanthouse

 


Coriander is an annual medicinal plant that is used as a spice in the kitchen. It is mainly grown for its fruits and green leaves to flavor foods.

धणे (कोथींबीर बियाणे)

जमीन:
 हलकी ते मध्यम प्रकारची जमीन या पिकासाठी निवडावी. कुठल्याही परिस्थितीत पाणी धरून ठेवणारी जमीन टाळावी. कोरडवाहू पीक पध्दतीत भारी जमिनीची निवड करावी.

लागवडीची वेळ :

 या पिकाची ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागवड करावी.

लागवडीची पध्दत:

 घण्याची लागवड सरी वरंबा पध्दतीने दोन ओळीतील अंतर ४५ सें.मी. आणि दोन झाडातील अंतर ४५ सें.मी. ठेवून टोकन पध्दतीने करावी.

पूर्वमशागत :

 शेतास आडवी उभी नांगरणी केल्यावर ढेकळे फोडून वखरणी करावी. जमीन भुसभूशीत करून घ्यावी व जमिनीत ओलावा टिकून राहील याची काळजी घ्यावी.

हेक्टरी बियाणे : 

ओलितासाठी १०-१२ किलो प्रति हेक्टरी आणि कोरडवाहू क्षेत्रासाठी २० किलो प्रति हेक्टरी बियाणे पुरेसे होते.

सुधारीत जाती: 

एसीआर-१, आरसीआर ४३६, जीसीआर २

लागवड :

घण्याची लागवड करण्याअगोदर भुसभूशीत जमिनीतील हलकी पाण्याची पाळी देवून जमिनीत ओलावा कायम राहील याची काळजी घ्यावी. लागवड करतांना बियाणे २ ते २.५ सें.मी. पेक्षा जास्त खोल जाणार नाही याची काळजी

बीज प्रक्रिया :

लागवडीपूर्वी घणे बियाण्यास रगडून घेवून बियाण्याचे दोन भाग होतील ही काळजी घ्यावी. यानंतर 

थायरम : 

२ ग्रॅम प्रति किलो बियाणे किंवा ४ ग्रॅम ट्रायकोडर्मा प्रति किलो बियाण्यास लावून बीज प्रक्रिया करावी.

ओलित व्यवस्थापन 

 ओलिताखालील धणे लागवडीसाठी भारी जमिनीत ३ ओलिताची आणि हलक्या जमिनीत ५ ते ६ ओलिताची गरज भासते. परंतु फुलोरावस्था व बीजधारणा या अवस्थेत पाण्याचा ताण पडणार नाही याची काळजी घ्यावी. पिकाचा 

कालावधी :

 धण्याचे पीक लागवडीपासून जाती परत्वे सरासरी १३० ते १५० दिवसात तयार होते.
काढणी घेण्याच्या झाडावरील ५० टक्के मुख्य उच्छत्रांचा रंग हिरव्यापासून करडा होणे सुरू झाला म्हणजे पीक काढणीस आले असे समजावे. 
काढणीस उशिर झाल्यास घण्याचा रंग काळपट होतो व त्यामुळे त्याची प्रत खालावते. काढणीनंतर झाडाचा शेंड्याकडील भाग आणि पेंडी अशारितीने ढिगात ठेवावी की जेणेकरून सूर्यप्रकाश सरळ धने बियाण्यावर पडणार नाही. 
धण्याचा रंग आणि प्रत कायम ठेवण्यासाठी काढणी नंतर पीक सावलीत वाळवावे. नंतर काडीने बदडून धने वेगळे करून घ्यावे व वान्याच्या मदतीने उफणून कचरा वेगळा करावा.

उत्पादन :

 धणे पिकापासून कोरडवाहू पीक परिस्थितीमध्ये ६ ते ७ क्विंटल प्रति हेक्टर तर ओलीत व्यवस्थापनामध्ये १० ते १२ क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन मिळू शकते.

coriander.  crop management
crop production and management
crop residue management 
thank you .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या