सोप (बडीसोप)
जमीन :
मध्यम ते भारी जमीन सोपीकरीता योग्य समजली जाते. मुरमाड किंवा सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण अत्यल्प असणारी जमीन निवडू नये.
लागवडीची वेळ :
ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सोपीची लागवड करावी परंतु खारपान पट्टयातील जमिनीत ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात लागवड केल्यास हरकत नाही असे आढळून आले.
लागवड पध्दत:
सोपीची लागवड सरी वरंबा पध्दतीने दोन ओळीतील अंतर ६० सें.मी. आणि दोन झाडांतील अंतर ४५ सें.मी. ठेवून टोकण पध्दतीने करावी अशी शिफारस करण्यात आलेली आहे. हेक्टरी बियाणे : सोपीचे हेक्टरी ५ ते ६ किलो बियाणे पुरेसे होते.
पूर्व मशागत:
शेतास आडवी उभी नांगरणी दिल्यावर ढेकळे फोडून वखरणी करावी. जमीन भुसभूशीत करून घ्यावी व जमिनीत ओलावा टिकून राहील याची काळजी घ्यावी.
सुधारित जाती :
आरएफ-१०१, एनआरसीएसएसएफ-१, सीओ-१, जीएफ १
लागवड :
सोपीची लागवड करण्या अगोदर भुसभूशीत जमिनीतील हलकी पाण्याची पाळी देवून जमीनीत ओलावा कायम राहील याची काळजी घ्यावी. लागवड करतांना बियाणे २ ते २.५ से.मी. खोल जाणार नाही याची काळजी घ्यावी नंतर लागवडीपूर्वी बियाण्यास कार्बेन्डाझिम २५ ग्रॅम प्रती किलो बियाणे वाप्रमाणे बीज प्रक्रिया करून लागवड करावी.
आलोत व्यवस्थापन :
साधारणपणे सोपीला ४-५ पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. फुलोरावस्थेत पिकास पाण्याचा ताण पडू देवू नये.
पिकाचा कालावधी : बियाणे पेरणीपासून १७०-१८० दिवसात बियाणे तयार होते.
काढणी : बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असलेली सोप काढणीकरीता खालील अवस्थेप्रमाणे तोडणी करावी. म्हणजे त्या त्या अवस्थेतील सोप तयार करता येते.
- अ) लखनवी सोप : उच्छत्र (फुले) झाडांवर आल्यापासून ३५-४० दिवसानंतर म्हणजेच लागवडीपासून ९०-९५ दिवसांनी काढणी केल्यास.
- ब) जाडी सोप : उच्छत्र (फुले) झाडांवर आल्यापासून ५०-५५ दिवसानंतर म्हणजेच लागवडीपासून १००-१०५ दिवसांनी काढणी केल्यास.
- क)सोप बियाणे : झाडावरच सोपीचे उच्छत्र (फुले) पूर्णपणे तयार झाल्यावर काढणी केल्यास, प्रत्येक प्रकारची सोपीची फुले तोडणीनंतर ७-८ दिवस सावलीत वाळवावी व नंतर थ्रेशरच्या सहाय्याने किंवा काठीने बदडून सोप वेगळी करावी.
उत्पादन :
सोप पिकाचे हेक्टरी
लखनवी सोप: ५-६ क्विंटल,
जाडी सोप: ९-१० क्विंटल
बियाणे सोप: १०-१२ क्विंटल उत्पादन मिळू शकते.
0 टिप्पण्या
शेतकरी मित्रांनो तुम्हाला हळद या पिकाबद्दल अजून कोणतीही माहिती हवी असेल तर खाली कमेंट करा तुमच्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला तुम्हाला मिळतील धन्यवाद व फॉलो करा,