ओवा - मसाला बियाणे पिके

ओवा - मसाला बियाणे पिके

जमीन :

 हलकी ते मध्यम प्रकारची जमीन या पिकासाठी निवडावी. खारपाण पट्टयातील जमीन सुध्दा उत्तम आढळून आलेली आहे. 

लागवडीची वेळ : 

ऑक्टोबर महिन्याचा शेवटचा आठवडा ते नोव्हेंबरचा पहिला आठवडा परंतु खारपाण पट्टयामधील जमिनीत या पिकाची लागवड कोरडवाहू पीक पध्दतीनुसार ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात करावी.

लागवडीची पध्दत:

 पेरणी पध्दतीने दोन ओळीतील अंतर ६० सें.मी. ते ७५ सें.मी. आणि टोकण पध्दतीने सरी वरंब्यावर ४५४३० सें.मी. अंतरावर लागवड करावी.

हेक्टरी बियाणे :

पेरणी पध्दतीने ४ ते ५ किलो, सरी वरंबा पध्दतीने ३ ते ४ किलो ओवा बियाणे अत्यंत बारीक व वजनाने हलके असल्यामुळे, लागवडीपूर्वी जमीन भुसभूशीत असणे अत्यंत गरजेचे आहे. उभी नांगरट करून ढेकळे फोडून घ्यावी. आडवी व उभी वखरणी करून हेक्टरी २० ३० गाड्या कुजलेले शेणखत टाकावे.

सुधारित जाती: 

अओ-०१-१९. आर-ए-१-८०, ओओ-०९-६१ आणि जीए-०१ 

लागवड : 

लागवडीपूर्वी जमिनीत ओलावा असणे अत्यंत गरजेचे आहे. तीफन किंवा ट्रॅक्टरच्या सहाय्याने लागवड करता येते. बियाणे जमिनीत २.५ सें.मी. पेक्षा जास्त खोल पडणार नाही याची काळजी घ्यावी. सरी वरंबा पध्दतीने लागवड. करतांना वरंब्याच्या मधोमध बियाणे टोकावे. बियाण्याचे आकारमान लहान व वजनाने हलके असल्यामुळे शक्यतो गोवरीचा कोरडा बुगदा किंवा लाकडाचा भुसा किंवा बारीक रेती १:१ प्रमाणात मिसळून पेरणी/टोकणी करावी.

बीज प्रक्रिया :

 लागवडीपूर्वी बियाण्यास २.५ ते ३ ग्रॅम कार्बेन्डाझीम प्रति किलो बियाण्यास चोळावे.

ओलीत :

 व्यवस्थापन अधिक उत्पादनाकरीता जमिनीच्या मगदुराप्रमाणे ४ ते ५ पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. मात्र फुलोरावस्थेत पाण्याची पाळी दिल्यास उत्पादनात भरीव वाढ होते.

पिकाचा कालावधी : 

ओवा पीक बियाणे पेरणीपासून १६० ते १७० दिवसात काढणीसाठी तयार होते..

 काढणी : 

झाडाचा व फुले (उत्छत्र) यांचा रंग पिवळसर पडण्यास सुरूवात झाल्यावर बुडापासून कापून घ्यावे. काढणीनंतर पिकास सावलीत ८ ते १० दिवस वाळवावे व नंतर थ्रेशरच्या सहाय्याने किंवा काडीने बदडून बी वेगळे करावे. 

उत्पादन :

ओवा पिकापासून हेक्टरी १२ ते १४ क्विंटल उत्पन्न मिळू शकते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या