भात पिकावरील रोगांचे व्यवस्थापन.
१) करपा व मानमोडी :
या रोगाच्यारोग नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक जातींचा वापर उदा. आर पी ४-१४, रत्ना, साकोली-६, आय आर-६४ इत्यादी, रोप वाटीकेत किंवा लावणीनंतर १५ दिवसांनी पानावर करपा रोगाची लक्षणे दिसताच कार्बन्डाझीम ५० टक्के डब्ल्युपी १० ग्रॅम किंवा मेन्कोझेब ७५ टक्के प्रवाही ३० ग्रॅम किंवा हेक्झाकोनॅझोल ५ टक्के प्रवाही २० मि.ली. वर दिलेल्या बुरशीनाशक आणि पैकी कोणतेही एक बुरशीनाशक दहा लिटर पाण्यात मिक्स करून फवारणीसाठी वापरावी.
२) कडाकरपा :
कॉपर हायड्रॉक्साईड ५३.८ टक्के डीएफ ३० ग्रॅम किंवा स्ट्रेप्टोमायसीन सल्फेट ९० टक्के + टेट्रा सायक्लीन हायड्रोक्लोराईड १० टक्के एसपी हे संयुक्त जीवाणु नाशक १.५ ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून लागवणीनंतर १० दिवसाच्या अंतराने दोन ते तीन फवारण्या कराव्यात.
३) आभासमय काजळी :
- या रोगाच्या नियंत्रणासाठी वरील प्रमाणे तीन टके मिठाच्या द्रावणाची बीज प्रक्रिया करावी आणि बियाला थायरम ७५ डब्ल्युपी ३ ग्रॅम प्रति किलो बियाणे औषध चोळून पेरणी करावी.
- हलके रोगट बी जाळावे.
- शेतात रोग आढळल्यास रोगट लोंब्या काढून जाळून नष्ट कराव्यात.
- कॉपर हायड्रॉक्साईड ७७ टक्के डब्ल्यूपी ३० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
४) राईस बंट (Tilletia barclayna) :
- या रोगाचा प्रादुर्भाव धान पिकवणाऱ्या भागात दिवसेंदिवस वाढत आहे. प्रमाणित बियाण्यामध्ये जर या रोगाचे प्रमाण ०.५ टक्क्याच्या वर आढळले तर बियाणे नापास करण्यात येते.
- या रोगामुळे तांदळाचा रंग काळा होतो. तांदळाचा काळा भाग म्हणजे या रोगाचे टेलीओस्पोअर बिजाणू होत. या रोगाचे बिजाणू बियाण्य व जमिनीत ४ ते ५ वर्षे सुप्तावस्थेत राहतात. नियंत्रणासाठी बियाणे ३ टक्के मिठाच्या द्रावणातून काढून धुवावे, हलके व रोगट बी काढावे.
- थायरम ७५ टक्के डब्ल्युएस ३ ग्रॅम/किलो बियाणे या प्रमाणात बीज प्रक्रिया करावी.
५) पर्णकोष करपा :
- फुटवे तयार होण्याच्या वेळी रोगाची लक्षणे खालच्या पानांवर पाण्याच्या पातळीजवळ दिसतात. ते लांबोडे किंवा दिर्घवर्तुळाकार हिरवट राखडी रंगाचे १ सें.मी. लांबीचे चट्टे नियमित गर्द तांबडे किनारे आणि मध्यभागी राखाडी रंगाचे असतात.
- या सारखेच लक्षणे पिकांच्या खोडावर सुध्दा आढळून येतात. रोगग्रस्त झाडांना चांगले दाणे न भरता खराब व फुटलेले दाणे दिसून येतात.
- खरीप हंगामात या रोगाची तीव्रता जास्त असते. ढगाळ वातावरण व दमट हवा आणि उष्णतामान या रोगवाढीस अनुकूल ठरतात.
- या रोगाच्या व्यवस्थापनाकरीता व्हॅलिडामायसीन ३ टक्के एल. २५ मि.ली. किंवा प्रोपिकोनॅझोल २५ टक्के ई.सी. १० मि.ली. किंवा हेक्झाकोनॅझोल ५ टक्के ई.सी. २० मि.ली. किंवा कार्बेन्डाझिम ५० टक्के डब्ल्यु. पी. १० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
६) पर्णकोष कुजव्या :
- हा बुरशीजन्य रोग असून लोंब्या बाहेर पडण्याच्या अवस्थेत असतांना पानाच्या पोंग्याच्या वरील भागावर दिसून येतो.
- या रोगाचे ठिपके तांबडे व अनियमित असून मध्यभागी राखडी व तांबडी किनारे अशा प्रकारचे आढळून येतात.
- रोगग्रस्त पिकांवर कमी दाणे भरतात आणि उत्पादनात घट येवू शकते. या रोगाच्या व्यवस्थापनाकरीता
१) योग्य अंतरावर रोपांची लागवड करावी.
२) रोगग्रस्त धसकटे जाळून टाकावीत
३) नत्र खताचा संतुलीत वापर करावा
धन्यवाद….
the plant house या पेजला फॉलो करा आणि शेती विषयक सर्व माहिती मिळवा
- जर तुम्हाला वरील माहिती आवडली असल्यास व शेती संबंधी काही अडचण असेल कमेंट मध्ये जरूर कळवा
- शेतकरी मित्रांनो आपणास कोणतेही पिकाबद्दल अजून कोणती माहिती हवी असेल तर खाली कमेंटमध्ये आम्हाला जरूर सुचवा
- अथवा कोणतीही शंका असेल तेही जरूर कळवा …आमचे तज्ञ तुमच्या शंकांचे निरसन करण्यासाठी सदैव तयार आहे.
0 टिप्पण्या
शेतकरी मित्रांनो तुम्हाला हळद या पिकाबद्दल अजून कोणतीही माहिती हवी असेल तर खाली कमेंट करा तुमच्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला तुम्हाला मिळतील धन्यवाद व फॉलो करा,