सूर्यफूल - किडी व त्यांचे व्यवस्थापन

 


१) तुडतुडे : 

तुडतुडे पाचरांच्या आकाराचे व फिक्कट हिरव्या रंगाचे असून ते पानाच्या मागील बाजूवर शिरांच्या बेबटीत आढळतात. प्रौढ व पिल्ले पानातिल रस शोषण करतात त्यामुळे पानाच्या कडा पिवळ्या पडतात. जास्त पादुर्भाव असल्यास पाने कोकडतात आणि वाळतात. तुडतुड्यांच्या एकिकृत व्यवस्थापनासाठी नत्राची मात्रा शिफारशी प्रमाणेच द्यावी. पेरणीपूर्वी ईमिटॅक्लोप्रीड ४८% एफ.एस. ५ मि.ली. प्रति किलो बियाणे प्रमाणे बीज प्रक्रिया करावी. किडीने आर्थिक नुकसानीची पातळी गाठल्यास (दोन तुडतूडे/पान) इमिडक्लोप्रोड १७.८% एस.एल १०० मि.ली. प्रति हेक्टरी ५०० लिटर पाण्यात (२ मि.ली. / १० लिटर पाणी) मिसळून फवारणी करावी (लेबल क्लेमनुसार)

२) फुलकिडे : 

फुलकिडे आकाराने लहान पिवळसर पांढऱ्या रंगाचे असतात. प्रौढ आणि पिल्ले पानाच्या पृष्ठभागावर आढळतात. पान ओरबडतात आणि त्यातून निघालेला रस शोषण करतात त्यामूळे पानाच्या वरील भागावर चट्टे दिसतात. प्रादुर्भावाच्या तिव्रतेने पाने वाळतात व झाडाची वाढ खुंटते. फुलकिडे मुफुलावर नेक्रोसिस रोगाचा प्रसार करतात. फुलकिडोच्या व्यवस्थापनासाठी पेरणीनंतर १५ व ३० दिवसांनी ईमिडक्लोप्रीड १७.८% एस. एल. १०० मि.ली. प्रति हेक्टरी ५०० लिटर (२ मि.ली./१० लिटर पाणी) मिसळून फवारणी करावी. (लेबल क्लेमनुसार)

३)  पाने खाणारी अळी : 

मादी पतंग पानाच्या पृष्ठभागावर पुंजक्याने अंडी घालते. अंड्यातून निघालेल्या अन्या सामुहिकपणे पानाचा हिरवा भाग कुरतडून खातात. त्यामुळे पाने जाळीदार होतात. जास्त प्रादुर्भाव झाल्यास मोठ्या फत पानाच्या शिराच शिलुक देवतात अंडीपूज व जाळीदार पाने तोडून नष्ट करावीत

४) उंट आळी : 

 मादी पतंग गोल पिवळसर एक एक अंडी पानाच्या पृष्ठभागावर घालते. अंड्यातून निघालेल्या लहान अळ्या सुरुवातीला पानाचा पृष्ठभाग कुरतडतात व जाळीदार करतात. मोठया अळ्या पाने खातात. तीव्र प्रादुर्भाव असल्यास झाडेपर्णहिन होतात. उंट अळीच्या नियंत्रणासाठी डायक्लोरवॉस ७६% ई.सी. ६२७ मि.ली. प्रति हेक्टरी ५०० ते ७०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. (१२.५ मि.ली. / १० लिटर पाणी)

५) घाटे अळी : 

मादी पतंग कळ्या व झाडाच्या कोवळ्या भागावर फिक्कट पिवळी अंडी एक एक करून घालते. अळ्या फुले येण्याआधी सुर्यफुलाची कोवळी पाने खातात. फुले घरल्यावर अळ्या फुलातील बिजांडकोष खातात. त्या दुधाळ ची खाऊनही नुकसान करतात. त्यामुळे स्तबकावर पोकळ्या आढळून येतात व उत्पादनात लक्षणीय घट होते.

६) केसाळ अळी : 

मादी पतंग पानाच्या पृष्ठभागावर पुजक्याने अंडी घालते. अंड्यातून निघालेल्या अळ्या सामुहिकपणे पानातील हिरवा भाग कुरतडून खातात, म्हणून पाने जाळीदार दिसतात. मोठ्या अळ्या शेतभर पसरतात आणि पाने खाऊन फक्त शिराव शिल्लक ठेवतात. अंडीपूज व जाळीदार पाने अळ्यासहित काढून नष्ट करावीत. या किडीच्या नियंत्रणासाठी सायपरमेथ्रीन १०% ई.सी. ६५०-७६० मि.ली. प्रति हेक्टरी ५०० ते ७०० लिटर पाण्यात मिसळून (१३ मि.ली. / १० लिटर पाणी) फवारणी करावी. सूर्यफुलावरील किडींचे एकात्मिक व्यवस्थापन : 

१) पिकांचा योग्य फेरपालट करावा. सूर्यफुलावर सूर्यफुल घेणे टाळावे. 

२) फुलकिडीच्या व्यवस्थापनासाठी पेरणीपूर्वी ईमीडक्लोप्रीड ४८% एफ. एस. ५. मि.ली. प्रति किलो प्रमाणे वीजप्रक्रिया करावी.

 ३) नत्राची मात्रा शिफारशीप्रमाणेच द्यावी. 

४) शेत तसेच बांध स्वच्छ ठेवावे. 

५) अंडीपूज असलेली पाने तसेच जाळीदार पाने त्यावरील अळ्यासकट गोळा करून नाश करावा. 

६) प्रकाश सापळ्याचा रात्री ७ ते ११ चे दरम्यान वापर करून पकडलेल्या पतंगाचा नश करावा. 

७) तंबाखूच्या पाने खाणाऱ्या अळीच्या व्यवस्थापनासाठी लिंगाकार्षक सापळ्यांचा ५ ते ६ प्रति हेक्टरप्रमाणे वापर करावा

 ८) किटकनाशकांचा वापर कमीत-कमी करून नैसर्गिक शत्रुचा उपयोग करून घ्यावा. २३ किडनी आर्थिक नुकसानीची पातळी गाठल्यावर शिफारस केल्याप्रमाणेच किटकनाशकांचा योग्य मात्रेत वापर करावा. 

१०) मधमाशाच्या परागीकरणामुळे सूर्यफुलाचे उत्पादन वाढीस मदत होते त्याचे रक्षण करावे, त्यांना इजा होईल अशा किटकनाशकांचा उपयोग करणे टाळावे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या