सूर्यफूल - रोग व त्यांचे व्यवस्थापन


1) पानावरील अल्टरनेरियाचे ठिपके : 

या रोगाचा प्रसार हवा, बियाणे व जमिनीव्दारे (जुन्या अवशेषापासून) होतो. या रोगामुळे पेरणीनंतर साधारणत: एक महिन्याने पानावर तपकिरी रंगाचे गोल ते अनियमित आकाराचे वर्तुळाकार चक्रे किंवा वलये असलेले ठिपके पडून कालांतराने काळपट व आकाराने मोठे होतात. मधील भाग ठिसूळ होऊन गळतो व छिद्रे पडतात. रोगाची तीव्रता जास्त असल्यास बीज धारणा बरोबर होत नाही आणि उत्पन्नात घट येते. पेरणीपूर्वी ट्रायकोडमा व्हिरीडी ४ ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीज प्रक्रिया करावी.

२) तांबेरा : 

तांबेरा हा बुरशीजन्य रोग असून त्याचा प्रसार हवेव्दारे होतो. रोगाची लागण खरीपापेक्षा रबी हंगामात पीक साधारणपणे ७०-७५ दिवसाचे असतांना होते. पानावर खालच्या बाजूस नारिंगी / तपकिरी रंगाचे फोड येतात व कालांतराने ते काळपट किंवा गर्द करड्या रंगावे होतात. रोगाची तीव्रता जास्त असल्यास पूर्ण पानावर दोन्ही बाजूस हे ठिपके विखुरलेले असतात. रोगामुळे पाने करपतात, गळून पडतात व बी भरत नाही. बियातील तेलाचे प्रमाण घटते व उत्पन्नात घट येते. पेरणीपूर्वी ट्रायकोडमां व्हिीडी४ ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीज प्रक्रिया करावी.

(३) नेक्रांसीस विषाणु रोग: 

या रोगाचा प्रादुर्भाव पिकाची रोपावस्था ते पीक परिपक्व होण्याच्या अवस्थेपर्यंत केव्हाही दिसून येतो. रोपावस्थेत काही झाडांची वाढ खुंटलेली व पानावर मोझॅक सारखी लक्षणे दिसतात. सुरुवातीला या रोगामुळे झाडाची पाने कडेकडून आतमध्ये काळी होतात गुण्डाळल्यासारखी/कोकडल्यासारखी दिसतात व पानाचा कोकडलेला तसेच इतर काही रोगग्रस्त भाग करपलेला दिसतो पुढे या रोगाचा प्रादुर्भाव पानाच्या देठावर, खोडावर व शेवटी शेड्यापर्यंत पसरतो. त्यामुळे पानाची देते काळी पडतात व खोडावर तुटक किंवा अखंड काळपट पदसतो व झाड वेडेवाकडे दिसते तसेच काही झाडांचे शेंडे करपल्यामुळे त्यावर कळीकरण रोगासारखी लक्षणे दिसतात. या रोगाचा प्रसार फुलकिड्यामुळे होतो..

व्यवस्थापन : 

रोग प्रसारक किडीपासून (फुलकिडे) रोगाला प्रतिबंधासाठी पेरणीपूर्वी ईमिडॅक्लोप्रीड ४८% एफ.एस. ५ मि.ली. प्रति किलो बियाण्यास चोळून बीज प्रक्रिया करावी. (लेबल क्लेमनुसार)

सुर्यफुल पेरणीपूर्वी ८-१० दिवस अगोदर पिकाच्या सभोवताल चारही बाजूनी ज्वारीच्या ५ ते ६ ओळी पेराव्यात. -+-त्यामुळे फुलकिड्यांचा प्रादुर्भाव कमी होऊन नेक्रोसीस रोगाच्या प्रसाराला आळा बसतो.

गाजर गवत, गोखरु, परडी इत्यादी तणांचा तसेच रोगट झाडांचा उपटून नायनाट करावा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या