ज्वारी पिकावरील नियंत्रण उपायांचा समन्वय साधून कीटक नियंत्रण / Integrated pest control on sorghum crop.

एकात्मिक कीड नियंत्रण





एकात्मिक कीड नियंत्रण हे व्यवस्थापन तंत्र आहे. या तंत्रात उपलब्ध असलेल्या विविध कीटक नियंत्रण उपायांचा समन्वय साधून कीटक नियंत्रण केले जाते

१) ज्वारीची पेरणी मान्सूनचा पाऊस पडताच लवकर करावी.

२) बियाणे हेक्टरी १० किलो ऐवजी १२ किलो वापरावे. तीन ते चार आठवडयांनी विरळणी करुन खोडमाशीग्रस्त झाडे उपटून टाकावीत.

३) उन्हाळयात जमिनीची खोल नांगरट करावी. त्यामुळे जमिनीतील अळया व इतर किडी उघडया पडून भक्षस्थानी पडतील किंवा

सूर्यप्रकाशामुळे नाश पावतील.

४) किड प्रतिबंधक वाणाची पेरणी करावी. उदा. सुधारित वाण एस.पी.व्ही. ४६२, सी.एस.व्ही. १३, सी.एस.व्ही. १५ आणि सी.एस.व्ही. २३ ह्या खोडमाशी प्रतिबंधक वाणाची पेरणी करावी. बियाण्यास इमिडॅक्लोप्रीड १० मि.ली. प्रति बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी.

५) मावा, तुडतुडे, इत्यादी रस शोषण करणा-या किडींसाठी बांधाकडील जमिनीची चांगली मशागत करावी. वसावा होणारी मोठी झाडे तोडून टाकावीत.

६) किडींचा पूर्ण नाश न करता त्यांची संख्या पिकांचे आर्थिक नुकसान करणार नाही अशा पातळीवर ठेवण्याचा प्रयत्न करावा. जेणेकरून नैसर्गिक समतोल साधला जाईल, हा एकात्मिक कीड नियंत्रणाचा उद्येश आहे. त्यामुळे अवाजवी फवारणीची संख्या कमी होईल आणि शेतक-यांचा होणारा खर्च कमी होण्यास मदत होईल.

७) लिंबोळी तेल व त्यापासून तयार केलेले द्रावण फवारणीसाठी वापरावे. जेणेकरून पर्यावरणाचे प्रदुषण रोखण्यास मदत होईल. 

८) किडींची संख्या जेव्हा नेमकी आर्थिक नुकसानीच्या पातळीच्या वर जाण्याचा संभव आहे तेव्हांच कीटकनाशकांची फवारणी करावी.

९) खतांचा व पाण्याचा वापर योग्य व आवश्यकतेनुसार करावा.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या