ज्वारी पिकावरील किड-रोग नियंत्रण -
खोडकिडा
या किडीच्या बंदोबस्तासाठी ३५ टक्के प्रवाही एन्डोसल्फान ७०० मि.ली. ५०० लिटर पाण्यात मिसळून किड दिसू लागताच फवारणी करावी. दुसरी फवारणी गरजेनुसार करावी.
लष्करी अळी व कणसातील अळी
या किडीच्या नियंत्रणासाठी एन्डोसल्फान ४ टक्के भुकटी किंवा क्विनॉलफॉस १.५ टक्के भुकटी किंवा मॅलॅथिऑन ५ टक्के भुकटी किंवा कार्बारील १० टक्के भुकटी प्रति हेक्टरी २० किलो या प्रमाणात वारा शांत असतांना धुरळणी करावी.
करपा
या रोगामुळे पाने करपतात व नंतर जळतात. यासाठी कॉपर ऑक्सीक्लोराईड ४ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
काणी
काणीच्या नियंत्रणासाठी ज्वारीच्या १ किलो बियाण्यास ४ ग्रॅम (३०० मेश पोताची) गंधकाची भुकटी चोळून पेरणी करावी. झिफ्री किंवा काळा गोसावी या रोगाची झाडे दिसताच नष्ट करावी. त्यामुळे रोगाचा प्रसार थांबण्यास मदत होईल.
दाण्यावरील बुरशी (ग्रेनमोल्ड)
या रोगाच्या नियंत्रणासाठी कार्बेन्डेझीम (०.१ टक्के) + थायरम (०.२ टक्के) किंवा कॅप्टन (०.२ टक्के) + डायथेन एम. ४५ (०.२ टक्के ) किंवा अयोफंजीन (२०० पी.पी.एम.) + कॅप्टन (०.२ टक्के) या बुरशीनाशकांची फवारणी फुलोन्यानंतर करावी. दुसरी फवारणी १५ दिवसांनी किंवा दाणे पक्व अवस्थेत असतांना व तिसरी फवारणी पाऊस आल्यास करावी.
धन्यवाद….
the plant house या पेजला फॉलो करा आणि शेती विषयक सर्व माहिती मिळवा
- जर तुम्हाला वरील माहिती आवडली असल्यास व शेती संबंधी काही अडचण असेल कमेंट मध्ये जरूर कळवा
- शेतकरी मित्रांनो आपणास कोणतेही पिकाबद्दल अजून कोणती माहिती हवी असेल तर खाली कमेंटमध्ये आम्हाला जरूर सुचवा
- अथवा कोणतीही शंका असेल तेही जरूर कळवा …आमचे तज्ञ तुमच्या शंकांचे निरसन करण्यासाठी सदैव तयार आहे.
0 टिप्पण्या
शेतकरी मित्रांनो तुम्हाला हळद या पिकाबद्दल अजून कोणतीही माहिती हवी असेल तर खाली कमेंट करा तुमच्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला तुम्हाला मिळतील धन्यवाद व फॉलो करा,