फुलकोबी - भाजीपाला पिकांचे लागवड तंत्र
जमीन मध्यम ते भारी, परंतु पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी. लागवडीची वेळ : अ) लवकर येणाऱ्या : एप्रिल मे
- मध्यम येणाऱ्या : जून-जुलै-ऑगस्ट
- उशिरा येणाऱ्या: सप्टेंबर ऑक्टोबर
- हेक्टरी बियाणे: ६०० ते ७५० ग्रॅम
पूर्वमशागत :
शेतास आडवी उभी नांगरणी दिल्यावर ढेकळे फोडून घ्यावीत. वखराची एक पाळी देऊन जमिनीत चांगले कुजलेले शेणखत ४०-५० गाड्या हेक्टरी मिसळावे. नंतर पुन्हा वखराची एक पाळी द्यावी. सुधारित जाती :
- लवकर येणाऱ्या जाती : पुसा कातकी, पुसा दिपाली, अली कुंवारी, अली पटना.
- मध्यम काळात येणाऱ्या जाती : सुधारित जपानी, आघानी, पुसा सिंथेटीक, पुसा शुभ्रा
- उशिरा येणाऱ्या जाती : स्नो बॉल १६, स्नो बॉल १ व सिओ ९
रोपे तयार करणे व लागवड :
हेक्टरी ६०० ते ७५० ग्रॅम चांगल्या प्रतिचे बियाणे विकत घेऊन लवकर येणाऱ्या जातीचे बियाणे मे-जून, मध्यम येणाऱ्या जातीचे बियाणे जून ऑगस्ट आणि उशिरा येणाऱ्या जातीचे बियाणे सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये गादी वाफ्यावर पेरून रोप तयार करावे. रोपे १० ते १२ सें.मी. उंचीचे झाल्यानंतर किंवा रोपे ४ ते ६ आठवड्याचे झाल्यावर लागवडीस वापरावे.
लवकर येणाऱ्या जाती ४५ x ४५ सें.मी., मध्यम व उशिरा येणाऱ्या जाती ६० x ४५ सें.मी.
किंवा ६० x ६० सें.मी. अंतरावर (गादी वाफ्यातील ४ -६ आठवड्याची रोपे) वरंब्याच्या बगलेत स्थलांतरित कराव्यात. खत व्यवस्थापन हेक्टरी १०० किलो नत्र अधिक ५० किलो स्फुरद द्यावा.
यापैकी अर्धा नत्र अधिक पूर्ण स्फुरद स्थलांतराचे वेळी व राहिलेला नत्र स्थलांतरानंतर ३० दिवसांनी द्यावा.
ओलीत :
पिकाच्या गरजेनुसार १० - १२ दिवसांनी पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. जमिनीच्या मगदुराप्रमाणे हा कालावधी कमी जास्त करावा.
आंतरमशागत :
पीक स्वच्छ व निरोगी राहण्यासाठी २-३ निंदण द्यावेत तसेच १-२ उकऱ्या देऊन झाडांना मातीची भर द्यावी. फुलांना फुलकोबीचे पानाने झाकावे.
पिकाचा कालावधी :
फुलकोबी हे पीक बी पेरणीपासून ९० ते १२० दिवसात काढणीस तयार होते. हा कालावधी विविध जातीनुसार बदलू शकतो.
काढणी:
स्थलांतरानंतर ४० - ६० दिवसात पीक काढणीस तयार होते. पूर्ण वाढ झालेली फुले वरचेवर काढावीत. फुले काढणीस वेळ झाल्यास फुले पिवळा रंग धारण करतात व आणखी उशीर केल्यास फुलावर बुरशीसारखी वाढ आढळून येते.
हेक्टरी उत्पादन:
फुलकोबीचे (वाणानुसार) हेक्टरी १५० २५० किंटल उत्पादन मिळते. संकरीत वाणामध्ये फुलकोबीचे हेक्टरी ३०० ते ३५० क्विंटल उत्पादन मिळते.
0 टिप्पण्या
शेतकरी मित्रांनो तुम्हाला हळद या पिकाबद्दल अजून कोणतीही माहिती हवी असेल तर खाली कमेंट करा तुमच्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला तुम्हाला मिळतील धन्यवाद व फॉलो करा,