टरबूज (कलिंगड)

 


टरबूज (कलिंगड) 

  • जमीन : पाण्याचा उत्तम निचरा होणारी, मध्यम ते भारी जमीन निवडावी.
  • लागवडीची वेळ : जानेवारी-फेब्रुवारी
  • लागवडीची पध्दत : दांडाचे काठाने लहान आळ्यामध्ये बी टोकून पेरणी करावी. रूंद वरंबा पध्दतीने लागवड जास्त फायदेशीर आढळून आली आहे. रूंद वरंबा ४५ ते ६० सें.मी. रूंद असावा व दोन रूंद वरंब्यामध्ये ४ फुट अंतर ठेवावे. रूंद वरंब्यावर ठिबक व मल्चिंगचा वापर अधिक फायदेशीर ठरला आहे.
  • हेक्टरी बियाणे : ३-४ किलो बियाणे लागते. परंतु पोर्ट्रेमध्ये रोपे तयार करून लावल्यास हेक्टरी ६०० ते ७०० ग्रॅम बियाणे लागते.

पूर्वमशागत :

शेतास आडवी उभी नांगरणी केल्यावर ढेकळे फोडून वखरणी करावी. चांगले कुजलेले शेणखत हेक्टरी ३०-४० गाड्या टाकून पुन्हा वखरणी करावी.

सुधारित जाती:

 शुगर बेबी, असाही यामाटो, अर्का ज्योती, अर्का माणिक, दुर्गापूर मिठा, दुर्गापूर केशर, स्थानिक जाती. लागवड : दांडाचे काठाने लहान आळे करून २४१ मीटर अंतरावर बी टोकावे. बिया २४ तास पाण्यात भिजवून लावल्यास उगवण लवकर व चांगली होते. रुंद वरंब्यावर दोन रोपांमधील अंतर ४५ ते ६० सें.मी. ठेवावे.

खत व्यवस्थापन:

 हेक्टरी ८० किलो नत्र ४० किलो स्फुरद •४० किलो, पालाश द्यावा. यापैकी अर्धा नत्र पूर्ण स्फुरद R + पूर्ण पालाश लागवडीसोबत व राहिलेला अर्धा नत्र लागवडीनंतर ३० दिवसांनी द्यावा. फर्टीगेशन व्दारे हेक्टरी २००:१००:१०० किलो नत्र, स्फुरद व पालाश आवश्यकतेनुसार विभागून द्यावे.

ओलीत : 

दर ६-८ दिवसांनी पाण्याच्या पाळ्या द्याव्या. जमिनीचा मगदूर व पिकाची गरज यानुसार हा कालावधी कमी जास्त करावा. ठिबक सिंचनाने पाणी दिल्यास पाण्याची बचत होते व उत्पादनात सुध्दा वाढ होते.

आंतरमशागत :

 पीक स्वच्छ व निरोगी राहण्यासाठी २-३ निंदण द्यावे. फळ धारणा झाल्यावर फळे गवताने किंवा पाला पाचोळ्याचे सहाय्याने पूर्णपणे झाकून टाकावी. फळाखाली सुध्दा पाला पाचोळा घालावा. पिकाचा कालावधी : टरबूज हे पीक १००-१२० दिवसात तयार होते.

काढणी : 

पूर्णपणे वाढ होऊन परिपक्व झालेली फळे वरचे वर काढत रहावीत. 

उत्पादन : 

टरबूज पिकापासून हेक्टरी २००-३०० क्विंटल उत्पादन मिळते. संकरीत जातीपासून ४५० ते ५०० क्विंटल उत्पादन मिळते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या