टोमॅटो - पिकांचे लागवड तंत्र
जमीन :
मध्यम ते भारी, परंतु पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी.
लागवडीची वेळ :
(१) मे-जून, (२) सप्टेंबर ऑक्टोबर, (३) डिसेंबर-जानेवारी
अ) लागवडीची पध्दत गादी वाफ्यावर रोपे तयार करून ४-६ आठवड्याची रोपे स्थलांतरीत करावी.
ब) हेक्टरी बियाणे :
५०० ते ६०० ग्रॅम (सुधारित वाण). १५० ग्रॅम (संकरित वाण) पूर्वमशागत शेतास आडवी-उभी नांगरणी करून नंतर ढेकळे फोडून वखरणी द्यावी. जमिनीमध्ये चांगले कुजलेले शेणखत हेक्टरी ३०-४० गाड्या फेकून वखराची पाळी द्यावी.
सुधारित जाती :
भाग्यश्री, धनश्री, राजश्री, फुले राजा (संकरित), पुसा रूबी, रोमा, एस- १२०, पुसा अल डॉर्फ, पुसा गौरव अरका सौरभ, वसुंधरा.
लागवड:
सरी-वरंब्याचे वाफ्यामध्ये ६०x ६० से. मी अथवा ७५ x ६० सें. मी. अथवा ९०x ३० सें.मी. अंतरावर रोपे स्थलांतरीत करावी.
खते:
हेक्टरी ७५ ते १०० किलो नत्र अधिक ६० किलो स्फुरद अधिक ५० किलो पालाश द्यावे. त्यापैकी अर्धा नत्र अधिक पूर्ण स्फुरद व पालाश स्थलांतराचे वेळी आणि राहिलेला अर्धा नत्र स्थलांतरानंतर ३० दिवसांनी द्यावा. संकरीत वाणासाठी मात्रा ३०० कि. नत्र, १५० कि. स्फुरद व १५० कि. पालाश
ओलीत :
पिकाच्या गरजेनुसार १०-१२ दिवसानी पाण्याच्या पाळ्या द्याव्या. उन्हाळ्यात पाण्याच्या पाळ्या ४-५ दिवसांनी : द्याव्या. जमिनीच्या मगदुराप्रमाणे हा कालावधी कमी जास्त करावा.
आंतरमशागत:
पीक स्वच्छ राहण्यासाठी २-३ निंदण द्यावेत. तसेच जमीन मऊ राहण्यासाठी १-२ उकरी देऊन झाडांना मातीची भर द्यावी. तसेच आवश्यक असलेल्या झाडांना काठीचा आधार द्यावा. (जातीच्या प्रकारानुसार मांडव पध्दतीचा उपयोगकरावा)
पिकाचा कालावधी :
टोमॅटो पीक बी पेरणीपासून ५०-६० दिवसात फुलोऱ्यावर येते व प्रथम काढणीस ६०-८० दिवसात तयार होते. या पिकाचा कालावधी १६०-१८० दिवस असतो. विविध जातीनुसार हा कालावधी कमी-जास्त राहू शकतो.
काढणी:
पीक काढणीस तयार झाल्यावर दर ८-१० दिवसानी फळांची काढणी करावी. अशाप्रकारे साधारणपणे १०-१२ काढण्या मिळतात.
हेक्टरी उत्पादन:
टोमॅटो पिकापासून साधारणपणे हेक्टरी १६०-२०० क्विंटल उत्पादन मिळते. संकरीत जातीच्या टोमॅटो पासून ४०० ते ४५० क्विंटल उत्पादन मिळते.
0 टिप्पण्या
शेतकरी मित्रांनो तुम्हाला हळद या पिकाबद्दल अजून कोणतीही माहिती हवी असेल तर खाली कमेंट करा तुमच्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला तुम्हाला मिळतील धन्यवाद व फॉलो करा,