किडी, रोग व त्यांचे व्यवस्थापन :
मावा :
इतर पिकांवरील माव्यापेक्षा आकाराने मोठा, रंगाने काळा, मृदू, अर्ध गोलाकार असून शरीरावर पाठीमागचे बाजूस दोन शिंगे असतात. मावा हा झाडाची पाने, फांद्या व बोंडातून रस शोषण करतो. जास्त प्रादुर्भाव झाल्यास झाड वाळते. रस शोषणाशिवाय मावा आपल्या शरीरातून साखरेसारखा चिकट पदार्थ झाडावर टाकतो.
त्यावर काळी बुरशी वाढल्यामुळे झाडाचे अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेत बाधा येते. मावा किडीचा प्रादुर्भाव सप्टेंबरच्या शेवटच्या ते ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पेरलेल्या पिकावर कमी राहून उत्पन्न चांगले मिळते. कोरडवाहू क्षेत्राकरिता माव्या सारख्या रस शोषणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पेरणी सप्टेंबरच्या चवथ्या आठवड्यामध्ये करावी.
करडीच्या ३० टक्के झाडांवर माव्याच्या समूहाचा प्रादुर्भाव किंवा प्रत्येक झाडावर १५ ते २० मावा कीटक ही आर्थिक नुकसानीची मर्यादा पातळी आढळल्यास नियंत्रणासाठी डायमेथोएट ३० टक्के प्रवाही ६६० मि.ली. हेक्टरी ५००-१००० लिटर पाण्यात मिसळून (१३ मि.ली./ १०लिटर पाणी) फवारणी करावी. (लेबल क्लेमनुसार) किंवा फेन्थोएट २ टक्के डि.पी. २० किलो किंवा क्विनॉलफॉस १.५ टक्के डि.पी. २० किलो प्रति हेक्टरी ५०० ते १००० लिटर पाण्यातून फवारणी करावी. (४० ग्रॅम/१० लिटर पाणी)
अल्टरनेरियाचे ठिपके :
या रोगाचा प्रसार हवा, जमीन, तसेच दूषित बियाण्याव्दारे होतो. रोगाची तीव्रता जास्त असल्यास पानाची गळ होऊन उत्पन्नात घट येते.
मर रोग:
रोगाचा प्रसार बियाणे आणि दूषित जमिनीव्दारे होतो. या रोगाचे प्रमाण जास्त असल्यास खालची पाने वाळून झाड कोलमडून मरते व उत्पन्नात घट येते.
या रोगाच्या नियंत्रणाकरिता ट्रायकोडर्मा ४ ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात घेऊन बियाण्याच्या सर्व बाजूने चांगला थर बसेल अशाप्रकारे चोळावे, तसेच पिकाची फेरपालट करावी. रोगट झाडाचे अवशेष जाळून किंवा जमिनीत गाडून नष्ट करावेत.
0 टिप्पण्या
शेतकरी मित्रांनो तुम्हाला हळद या पिकाबद्दल अजून कोणतीही माहिती हवी असेल तर खाली कमेंट करा तुमच्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला तुम्हाला मिळतील धन्यवाद व फॉलो करा,