जवस हे रबी हंगामातील महत्वाचे तेलबिया पीक असून त्याचा उपयोग तेल व धागा निर्मितीसाठी केला जातो. जवस तेलामध्ये ५८ टक्के ओमेगा-३, मेदाम्ल आणि अँटीऑक्सीडंट (Antioxidant) आहेत. त्यामुळे हृदयरोगाला कारणीभूत असलेले विकार, रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराईड याचे प्रमाण कमी होते. संधीवात सुसह्य होतो. मधुमेह आटोक्यात येतो. कर्करोग व इतर रोगांना प्रतिकार शक्ती निर्माण होते म्हणून या बहुगुणी जवसाचे दैनंदिन आहारात घेणे उपयोगी ठरते. या पिकास थंड हवामान उपयुक्त असून हे पीक जिरायती आणि बागायती लागवडीस योग्य आहे. या पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी वेळेवर लागवड, सुधारित वाणांचा वापर आणि किडी व रोगापासून संरक्षण या बाबींकडे काळजीपूर्वक लक्ष देणे आवश्यक आहे.
जमिनीची निवड व पूर्वमशागत:
या पिकाकरिता मध्यम ते भारी, ओलावा टिकवून ठेवणारी जमीन निवडावी. हेक्टरी १० गाडया चांगले कुजलेले शेणखत टाकून व वखराच्या दोन पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी जेणेकरून पेरणी सोपी जाईल व बियाण्याची उगवण चांगली होईल.
पेरणीची वेळ :
या पिकाच्या वेळेवर पेरणीला फार महत्व आहे. वेळेवर पेरणी केली तर गादमाशी ही कीड व मर या रोगाचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात आढळून येतो व उत्पन्नात वाढ होते. म्हणून कोरडवाहू पिकाची पेरणी ऑक्टोबरच्या पहिल्या: पंधरवाड्यात तर बागायती पिकाची पेरणी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत करावी.
बीज प्रक्रिया:
पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास कार्बेन्डाझिम २ ग्रॅम किंवा थायरम ३ ग्रॅम लावावे. त्यानंतर ३ तासांनी अॅझोटोबॅक्टर २० ग्रॅम व स्फुरद विरघळणारे जिवाणु २० ग्रॅम प्रति किलो बियाणे यांची चोज प्रक्रिया करावी
आंतरपीक :
या पिकात जवस हरभरा, जवस करडई (४:२), जवस मोहरी (५:१) या प्रमाणात घेता येते. + + पेरणी : पिकाची पेरणी मुख्यत्वे चाड्याच्या तिफणीने करावी. दोन ओळीतील अंतर ३० सें.मी. ठेवावे. पेरताना बियाणे योग्य खोलीत पडेल याची काळजी घ्यावी.
बियाण्याचे प्रमाण:
२५ किलो प्रति हेक्टरी बियाणे वापरावे.
ओलित व्यवस्थापन :
या पिकास कमीत कमी दोन ओलिताची आवश्यकता आहे. पहिले ओलीत पिक फुलोऱ्यावर असतांना म्हणजेच ४०-४५ दिवसांनी व दुसरे ओलित ६५-७० दिवसांनी (बोंड्या धरण्याच्या वेळेस) द्यावे.
आंतरमगशात :
जवसाचे पीक पहिले ३० दिवस तणविरहीत ठेवले तर उत्पादनात वाढ होते. पेरणीनंतर २५ दिवसांनी पहिली डवरणी करणे आवश्यक आहे. तणांचा प्रादुर्भाव लक्षात घेता निंदन करावे.
जवस पिकाचे कोरडवाहू परिस्थितीत अधिक आर्थिक मिळकतीकरीता पेरणीनंतर ३० दिवसांनी निंदण करून त्यात तणांच्या अवशेषाचे आच्छादन करावे.
पीक काढणी:
पिकाची पाने व बोंड्या पिवळ्या पडल्यावर पीक काढणीस योग्य समजावे. या पिकाची कापणी विळ्याच्या सहाय्याने करावी. कापणी झाल्यानंतर ४-५ दिवस वाळवून मळणी करावी व बी योग्य प्रकारे साठवून ठेवावे.
0 टिप्पण्या
शेतकरी मित्रांनो तुम्हाला हळद या पिकाबद्दल अजून कोणतीही माहिती हवी असेल तर खाली कमेंट करा तुमच्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला तुम्हाला मिळतील धन्यवाद व फॉलो करा,