भेंडी पिकांचे लागवड तंत्र

 


भाजीपाला पिकांचे लागवड तंत्र 

भेंडी  

जमीन :

 मध्यम ते भारी पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी. लागवडीची वेळ : खरीप (जुन-जुलै) आणि उन्हाळी (जानेवारी-फेब्रुवारी) 
  • लागवडीची पध्दत सपाट वाफ्यांमध्ये बी टोकून. 
  • हेक्टरी बियाणे : ८ ते १० किलो खरीप, १० ते १५ किलो उन्हाळी 

पूर्वमशागत:

 शेतास आडवी-उभी नांगरणी दिल्यानंतर ढेकळे फोडून वखरणी करावी. शेतात चांगले कुजलेले शेणखत हेक्टरी
३०-४० गाड्या टाकावे. यानंतर पुन्हा एक वखरांची पाळी द्यावी. 

सुधारित जाती : 

 प्रगती (डॉ. पंदेकृवि विकसीत), अर्का अनामिका, पुसा मखमली, परभणी क्रांती, पुसा अ-४, फुले विभक्ता या जातींची निवड करावी.

लागवड :

सरी वरंबा पध्दतीने पावसाळी पिकास ६०x४५ सें.मी व उन्हाळी पिकास ४५ x ३० सें.मी. अंतरावर बी टोकावे.

खत व्यवस्थापन 

२० टन शेणखत पेरणीपूर्वी १५ दिवस अगोदर टाकावे. रासायनिक खताच्या मात्रेमध्ये हेक्टरी १०० किलो नत्र अधिक ५० किलो स्फुरद व ५० किलो पालाश द्यावा. त्यापैकी अर्धा नत्र, संपूर्ण स्फुरद व पालाश लागवडी सोबत व राहिलेला अर्धा नत्र लागवडीनंतर ३० दिवसांनी द्यावा. तसेच अॅझोटोबॅक्टर व स्फुरद विरघळविणारे जिवाणू खते,
१५ ग्रॅम प्रति १ किलो प्रत्येकी बियाण्यास चोळावे.

ओलीत  :

पिकाच्या गरजेनुसार ८-१० दिवसांनी पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. उन्हाळ्यात पाण्याच्या पाळ्या ४-५ दिवसांनी : द्याव्यात. जमिनीच्या मगदूरा प्रमाणे हा कालावधी कमी जास्त करावा.

आंतरमशागत : 

पीक स्वच्छ व निरोगी राहण्यासाठी २-३ निंदण द्यावे.

पिकाचा कालावधी : 

लागवडीपासून ४०-४५ दिवसात भेंडी प्रथम काढणीस तयार होते. या पिकाचा कालावधी १०० - १२५ दिवस असतो.

काढणी: 

पीक काढणीस तयार झाल्यावर दर ३-४ दिवसानी फळांची काढणी करावी. हेक्टरी उत्पादन साधारणपणे १० ते १२ 

तोडणीत हेक्टरी:

 ५०-७५ क्विंटल उत्पादन मिळते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या