हळद यशस्वीरित्या लागवण्याचे तंत्रज्ञान: शेतकऱ्यांसाठी संपूर्ण मार्गदर्शक | Turmeric Farming in India

 


हळद 

जमीन: 

 पाण्याचा उत्तम निचरा होणारी, भुसभुशीत, मध्यम जमीन निवडावी. लागवडीची वेळ : मे-जून 

1. लागवडीची पद्धत सरी वरंब्यावर किंवा रूंद वरंबा तयार करून येणे लावावीत.

 2. हेक्टरी बेणे: २२५० ते २५०० किलो (जेठे गड्ढे).

पूर्वमशागत:

 जमिनीस आडवी उभी नांगरणी केल्यावर ढेकळे फोडून वखरणी करावी. नंतर चांगले कुजलेले शेणखत हेक्टरी ४०-५० गाड्या टाकून पुन्हा वखरणी करावी.

सुधारित जाती : 

पीडीकेव्ही वायगांव, फुले स्वरुपा, राजापुरी, कृष्णा,

लागवड :

सरी वरंब्याचे वाफ्यामध्ये जेठे गड्ढे असलेले बेणे ३० ते ४० सें.मी. अंतरावर वरंबे करून त्यात २२.५ ते ३० सें.मी. अंतरावर लावावे. ठिबक सिंचनासाठी २० ते २५ सें. मी. उंचीचे १२० सेंमी. रुंदीचे गादी वाफे तयार करून ३०४३० सेंमी. वर लागवड करावी.

खत व्यवस्थापन :

हेक्टरी  २०० नत्र: १०० स्फुरद: १०० पालाश / किलो द्यावा. यापैकी अर्धा नत्र उगवण पूर्ण झाल्यावर अंदाजे ३० दिवसांनी राहिलेला अर्धा नत्र पहिल्या नत्राच्या मात्रे नंतर ४५ दिवसानी द्यावा,

ओलीत:

 दर ८-१० दिवसांनी पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. जमिनीच्या मगदुराप्रमाणे किंवा पिकाच्या गरजेनुसार हा कालावधी कमी जास्त करावा. काढणी अगोदर १५ ते २० दिवस अगोदर पाणी देणे बंद करावे.

आंतरमशागत:

 तण नियंत्रणासाठी पेन्डिमेथॅलीन १.५ किलो क्रियाशील घटक प्रति हेक्टरी लागवडीनंतर दोन ते तीन दिवसांनी फवारणी करुन आठ आठवड्यांनी एक निंदणी करावी. झड़ना मातीची भर ही 80ते 90 दिवसांच्या आतच द्यावी.

पिकाचा कालावधी:

 हळद या पिकास २१० ते २७० दिवस कालावधी लागतो.

 काढणी :

काढणीस तयार झालेल्या झाडांचे पाणी 50 टक्के पेक्षा जास्त सुकून गेलेले असतात व तेव्हाच ते काढणीस तयार झाले असे समजावे.  खोदून हळद पिकाची काढणी करतात. त्यापैकी जेठे गड्ढे व आंगठे गड्ढे अशी विभागणी करून गोल गड्ढे बेणे म्हणून व आंगठे गड्ढे हळदीसाठी वापरावेत.

उत्पादन:

 हळद पिकापासून २२० ते ३५० क्विंटल प्रति हेक्टर ओल्या हळदीचे उत्पादन मिळते.


शेतकरी मित्रांनो तुम्हाला हळद या पिकाबद्दल अजून कोणतीही माहिती हवी असेल तर खाली कमेंट करा तुमच्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला तुम्हाला मिळतील धन्यवाद व फॉलो करा.

👨‍🌾👨‍🌾👨‍🌾👨‍🌾


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या