आंबा मोहोर संरक्षण
आंबा हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे फळपीक आहे. मात्र बऱ्याच वेळा आंबा बागेपासून अपेक्षित उत्पादन मिळत नसल्याचे अनेक शेतकरी सांगतात. आंबा बागेपासून अपेक्षित उत्पादन न मिळण्यामागे अनेक कारणे आहेत. त्यातील एक प्रमुख कारण म्हणजे आंबा मोहोराचे कीड व रोगापासून होणारे नुकसान. शेतकरी बंधूनी कीड व रोगांचे वेळीच व्यवस्थापन केल्यास आंबा पिकाचे उत्पादन निश्चितच वाढू शकेल.
शिफारस करण्यात आलेले आंबा मोहोर संरक्षण वेळापत्रक
| फवारणीचा कालावधी | कीटकनाशक | १० लीटर पाण्यासाठी प्रमाण | शेरा | |
|---|---|---|---|---|
| पहिली फवारणी पावसाळ्यानंतर येणारी कोवळी पालवी | डेल्टामेथ्रीन २.८ टक्के | ९ मि.ली. | ही फवारणी संपूर्ण झाडावर तसेच खोडावर घ्यावी यामुळे पावसाळ्यात खोडावर लपलेल्या प्रौढ तुडतुड्यांचा देखील नाश होतो. | |
| दुसरी फवारणी बोंगे फुटताना | लॅम्बडा सायहेलोधीन ५ टक्के | ६ मि.ली. | ढगाळ पावसाळी वातावरण असल्यास करन रोगाच्या नियंत्रणासाठी कार्बेन्डॅझीम ५० टक् १० ग्रॅम किंवा थायोफिनेट मिथिल ५० टन्न १० ग्रॅम किंवा प्रोपिनेब ७० टक्के २० प्रेम प्रति १० लीटर पाण्यात मिसळून वापरावे | |
| तिसरी फवारणी दुसऱ्या फवारणीनंतर १५ दिवसांच्या अंतराने | इमिडाक्लोप्रीड १७.८ टक्के किंवा बुप्रोफेझिन २५ टक्के | ३ मि.ली. २० मि ली | तिसऱ्या, चौथ्या व पाचव्या फवारणीच्या वेळेस कीटकनाशकाच्या द्रावणामध्ये पुरी रोगाच्या नियंत्रणासाठी ५ टक्के | |
| चौथी फवारणी तिसऱ्या फवारणीनंतर १५ दिवसांच्या अंतराने | थायोमेथॉक्झाम २५ टक्के | २.० ग्रॅम | हेक्झकोनॅझोल ५ मि.ली. किंवा पाण्यात विरघळणारे ८० टक्के गंधक २० ग्रॅम तसेच ढगाळ पावसाळी वातावरण असल्यास करर रोगाच्या नियंत्रणासाठी कार्बेन्डॅझीम १२ टक + मॅन्कोझेब ६३ टक्के (तयार मिश्रण) १० ग्रॅम प्रति लीटर पाण्यात मिसळून वापरावे | |
| पाचवी फवारणी चौथ्या फवारणीनंतर १५ दिवसांच्या अंतराने | डायमेथोएट ३० टक्के किंवा लॅम्बडा सायहेलोथीन ५ टक्के | १४ मिली. | याप्रमाणे किटकनाशकाची फवारणी करावी | |
| सहावी फवारणी पाचव्या फवारणी नंतर गरज असल्यास १५ दिवसांच्या अंतराने | _ | ६ मि.ली | पाचव्या फवारणीमध्ये सुचविलेल्या कीटकनाशकांपैकी न वापरलेल्या कीटकनाशकाची फवारणी करावी. |
१. तुडतुडे :
तुडतुडे ही आंबा पिकाची पालवी व मोहोराचे नुकसान करणारी कीड समजली जाते. तुडतुड्यांचा समावेश रस शोषणाऱ्या किडींमध्ये होतो.
• तुडतुडे करड्या रंगाचे, गव्हाच्या दाण्याएवढे आकाराचे असतात.
• तुडतुडे पावसाळ्यानंतर येणाऱ्या पानांच्या मध्य शिरेत अंडी घालतात. अंड्यातून बाहेर येणारी पिल्ले काळसर रंगाची असतात.
2. मिजमाशी :
• आंबा पिकाची पालवी व मोहोराचे नुकसान करणारी दुसरी महत्वाची कीड म्हणजे मिजमाशी, ही एक माशी वर्गातील कीड आहे माशी आकाराने सूक्ष्म, पांढरट पिवळसर रंगाची असते.
• मिजमाशी कोवळ्या पालवीच्या दांड्यामध्ये, पानांच्या देठामध्ये तसेच मोहोराच्या दांड्यामध्ये व लहान फळांवर असंख्य अढी घालते अंड्यातून बाहेर येणारी अळी सूक्ष्म, पिवळसर रंगाची असते, ती पालवीचे तसेच मोहोराचे नुकसान करते त्यामुळे पालवी व मोहोर सुकून जातो
• या किडीचा प्रादुर्भाव सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यातील कोवळ्या पालवीवर मोठ्या प्रमाणात असतो त्यामुळे नियंत्रणाच्या उपाययोजना न अवलंबल्यास झाडावर सुकलेले शेंडे दिसून येतात. हा प्रादुर्भाव शेंडे पोखरणाऱ्या अळीच्या प्रादुर्भावासारखा दिसतो.
३. फुलकीड :
• आंबा पिकाची पालवी तसेच मोहोराचे व फळांचे नुकसान करणारी ही एक महत्त्वाची कीड आहे ही कीड आकाराने अतिशय सूक्ष्म असते यातील काही जाती पिवळसर रंगाच्या तर काही काळसर रंगाच्या असतात
• फुलकिडी कोवळ्या पालवीच, मोहोराच्या दांड्याची साल खरवडतात. तसेच कळ्या आणि फुलांच्या आतील भाग देखील खरवडतात. हल्ली नवीन आढळून आलेले जातीमध्ये फळांची साल देखील खरवडली जाते.
•पानाच्या मुख्य शिरा व उपमुख्य शिरा काळसर पडतात व पानाच्या कडा वरच्या बाजूला वळलेल्या दिसतात. प्रादुर्भावाची तीव्रता वाढल्यास पानगळ होते. यामुळे फळावर प्रादुर्भाव झाल्याचा दिसून येते. फळाचा हिरवा रंग जाऊन फळावर कार्डे तपकिरी रंगाचे चिट्टे दिसून येतात व त्यामुळे फळ खराब दिसते.
आंबा मोहोराचे नुकसान करणारे महत्त्वाचे रोग :
१. भुरी:
• भुरी या बुरशीजन्य रोगामुळे अंबामोहरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले दिसून येते. मोहोराच्या दांड्यावर भुरकट रंगाची बुरशी वाढते. भुरी मुळे मोहर चे दांडे सुकून गेल्याचे व त्यामुळे मोहर गळून पडल्याचे दिसून येते. त्यामुळे उत्पन्नात मोठ्या प्रमाणावर घट येते.
२. करपा :
• करपा पिकामुळे आंबा पिकाची पालवी मोहर आणि फळाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते व कोवळ्या पानावर गोलाकार सूक्ष्म ठिपके पडलेले दिसून येतात. ठिपक्यांच्या भोवताली पिवळ्या रंगाचे वलय दिसून येते ठिपकेग्रस्त पालवी जून झाल्यावर मधला भाग सडून गळून जातो व पानांवर आरपार छिद्रे दिसतात.
•मोहरा वर रोगाचा प्रादुर्भाव पुण्याला अचानक पडणारा पाऊस हाही कारणीभूत असतो. मोहोराच्या दांड्यावर काळसर तपकिरी ठिपके वाढतात व ते एकमेकांत मिसळतात. छोट्या फळावर व मोहर वर देखील काळी टीपके उठून दिसतात. पोषक वातावरणात संपूर्ण मोहोर करपून जातो.
वरील सर्व महत्त्वाचे कीड व रोगांचे नियंत्रणासाठी वर शिफारस केलेल्या वेळापत्रकाचा अवलंब करावा
३. फांदीमर :
सध्या काजू बागांमध्ये फांदीमर नावाचा रोग मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे हा एक बुरशीजन्य रोग आहे. या रोगाची लागण पावसाळ्यात होते. फांद्या टोकाकडून खाली मरण पावतात, पाऊस संपत संपता झाडावर मेलेल्या फांद्या जिथून मी पुढे मेलेल्या असतात त्यापुढे पांढऱ्या रंगाच्या रेषा दिसून येतात.
Tip : पावसाची उघडीप पाहून मेलेल्या फांद्या छाटाव्यात.
फांदी छाटताना जिथून रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे त्याच्या खालून छाटावेछाटलेल्या फांद्या जाळून नष्ट कराव्यात व छाटलेल्या भागावर बोडोंपेस्ट लावावी. तसेच संपूर्ण झाडावर १ टक्का बोर्डो मिश्रणा फवारणी घ्यावी. जास्त प्रादुर्भाव झालेल्या भागात पाऊस सुरू होण्यापूर्वी बोर्ड मिश्रांची फवारणी करावी.
- आंबा पिकावरील कीड व रोगांच्या एकात्मिक व्यवस्थापनासाठी उपाययोजना:
१. पावसाळा संपताच बागेची साफसफाई करावी. बागेतील सुकलेल्या व मेलेल्या फांद्या छाटून जाळून टाकाव्यात.
२. झाडांची वाढ दाट झाली असल्यास फांद्यामध्ये सूर्यप्रकाश पोहोचेल, अशा प्रकारे फांद्यांची विरळणी करावी.
३. मे महिन्यात फळांची काढणी पूर्ण झाल्यावर रोगट फांद्या छाटून, बांडगूळ काढून टाकावे व त्यानंतर १ टक्का बोडोंमिश्रणाची फवारणी करावी. याचा उपयोग फांदीमर रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी देखील होतो.
४ पालवी व मोहोर ची तपासणी करून रोगाची व किडींची निरीक्षणे करावी. योग्य ती फवारणी घ्यावी व जवळच्या संशोधन केंद्राची मुदत घ्यावी.
५. आंब्यावरील तुडतुड्यांच्या नियंत्रणासाठी लेकॅनीसिलीयम (व्हर्टीसिलीयम) लिकेंनी तसेच मेटॅरिझियम ॲनिसोप्ली या जैव नियंत्रणक्षम बुरशीच्या प्रजातींचा अंतर्भाव करावा बागेत जास्त आर्द्रता असताना (ऑक्टोबर ते डिसेंबर) या बुरशींची फवारणी तुडतुड्याच्या नियंत्रणासाठी उपयुक्त ठरते (५ ग्रॅम/लीटर)
६. आंब्यावरील फळमाशीच्या नियंत्रणासाठी बागेत शिफारस केलेले रक्षक फळमाशी सापळे हेक्टरी ४ या प्रमाणात लावावेत.
७. आंब्यावरील फळमाशी व फळे पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी बागेत गळून पडलेली फळे गोळा करून नष्ट करावीत.
thank you 😊
more -
सूर्यफूल - किडी व त्यांचे व्यवस्थापन
follow me on instagram click on it 👉👉 instagram


.jpeg)


0 टिप्पण्या
शेतकरी मित्रांनो तुम्हाला हळद या पिकाबद्दल अजून कोणतीही माहिती हवी असेल तर खाली कमेंट करा तुमच्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला तुम्हाला मिळतील धन्यवाद व फॉलो करा,